ग्रामीण भागातूनही चोर पळवत आहेत दुचाकी वाहने

Admin
0

 

Thieves are stealing two-wheelers from rural areas as well

बार्शी विशेष : राहत्या घरासमोरून मोटरसायकल चोरीला गेल्याची घटना पांगरी पोलिस ठाणे हद्दीत घडली. याबातची फिर्याद जनक गोवर्धन पालके (वय ३४) रा. पिपळगाव (दे), ता. बार्शी यांनी पांगरी पोलिस ठाण्यात दिली आहे.

मौजे पिपळगाव (दे) गावातून धोत्रेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत फॉरेस्टसमोर फिर्यादी राहण्यास असून, त्यांनी रात्री घरासमोर हँडल लॉक करून लावलेली मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीआर-४६१९) रात्रीतून चोरट्याने पळवली. ही घटना दि. १८ ते १९ फेब्रुवारी रोजी रात्री १० ते सकाळी ५ च्या दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)