येथे काय करतो म्हणत युवकाला वीट फेकून मारली

Admin
0

The young man was thrown a brick saying what he was doing here

बार्शी विशेष : तू येथे काय करतो असे म्हणत युवकाला लाथाबुक्क्याने मारहाण करुन वीट डोक्यात फेकून मारल्याची घटना बार्शीतील अमन चौक येथे घडली.

दि. १८ फेब्रुवारी रोजी रात्री धार्मिक प्रार्थना आटोपल्यानंतर फिर्यादी, मित्र उमेर बागवान (रा. बारंगुळे प्लॉट, अमन चौक, बार्शी) याला घरी सोडण्यासाठी गेले असता, फिर्यादीच्या गल्लीत राहणारे किरण टामटे व कृष्णा टामटे (रा. बारंगुळे प्लॉट, अमन चौक, बार्शी) हे मोटरसायकलवरून तेथे आले आणि त्यांनी तू इथे काय करतो असे विचारले. तेव्हा फिर्यादीने उमेरला सोडण्यास आलो म्हणताच, त्या दोघांनी शिवीगाळी करून लाथाबुक्क्याने मारहाण केली व रोडवरील वीटेचा तुकडा फेकून मारला, तो डोक्यात लागून जखम झाली, अशी फिर्याद आफताब खानसाब शेख (वय १८) रा. बारंगुळे प्लॉट, अमन चौक, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)