लोणचे पॅकेट दोन रुपयाला का दिले नाही म्हणून चाकूने वार; बार्शीतील घटना

Admin
0

Stabbed with a knife as to why the pickle packet was not given for two rupees; incident in Barshi

बार्शी विशेष : लोणचे पॅकेट दोन रूपयांस देण्यास नकार दिल्यामुळे दुकानदारावर चाकूने वार केल्याची घटना बार्शीतील नाळे प्लॉट येथे घडली. याबाबत विनायक किरण ऐतवाडे (वय २०) रा. नाळे प्लॉट, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी नाळे प्लॉट येथे असलेल्या त्यांच्या किराणा स्टोअर्समध्ये बसलेला असताना, संतोष कदम, रा. यशवंत नगर, बार्शी नावाच्या व्यक्तीने येऊन लोणचे पॅकेट मागितले. त्याला दिलेले दहा रुपये किंमतीचे लोणचे पॅकेट दोन रुपयास दे म्हणू लागला. तेव्हा फिर्यादीने पॅकेटची किंमत दहा रूपये आहे, मी ते दोन रुपयांस देवू शकत नाही, तुम्हाला घ्यायचे तर घ्या असे म्हणून नकार दिला, तेव्हा तो शिवीगाळी करत निघून गेला.

पुन्हा त्याच दिवशी रात्री फिर्यादीची आई दुकानात असताना, तो इसम दुकानासमोर येवून तुमचा मुलगा कुठे आहे असे विचारु लागला. त्यावेळी फिर्यादी घरातून बाहेर दुकानासमोर येताच त्याने, तू मला लोणच्याचे पॅकेट दोन रुपयाला का दिले नाही म्हणून हातातील चाकूने फिर्यादीच्या डाव्या खांद्यावर वार केला आणि ढकलून देत शिवीगाळी करत निघून गेला. ही घटना दि. २१ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते रात्री साडेनऊचे दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)