बार्शी विशेष : छत्रपती कॉलनीतून बांधकामासाठी आणून ठेवलेल्या साहित्यापैकी काही साहित्य चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला.
बार्शीतील छत्रपती कॉलनी, कुर्डूवाडी रोड येथे इमारतीचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, बांधकामासाठी लागणारे साहित्य चार महिन्यापूर्वी आणून ठेवले होते. त्या साहित्याची पाहणी करताना, त्यापैकी चार टी अँगल चोरीस गेल्याचे आढळून आले.
दि. २ फेब्रुवारीच्या रात्री साडेदहा ते ३ फेब्रुवारीच्या सकाळी नऊ या दरम्यान चोरीची घटना घडल्याची फिर्याद, सदर ठिकाणी स्टोअर मॅनेजर म्हणून काम पाहणारे सचिन रामचंद्र इंगळे (वय ३८) रा. सौंदरे, ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
