बार्शी विशेष : संत रोहिदास महाराजांची जयंती विविध स्पर्धेचे आयोजन करून संत रोहिदास प्रतिष्ठानच्यावतीने साजरी करण्यात आली.
त्यामध्ये सामान्य ज्ञान स्पर्धा, निबंध, चित्रकला, रांगोळी आणि स्लो सायकल या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. हाफ-पीच टेनिस बॉल स्पर्धेमध्ये उत्तरेश्वर क्रिकेट क्लबने प्रथम स्थान, अलीपूर क्रिकेट क्लबने द्वितीय स्थान तर शेलगाव क्रिकेट क्लबने तृतीय स्थान पटकावले. बक्षीस वितरण संत रोहिदास महाराज जयंती निमित्त ५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रतिमेचे पूजन विजय राऊत व दीपक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संत रोहिदास महाराज भवन येथून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. राऊळ गल्लीतील संत रोहिदास भवन येथे महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवन अहिरे, सागर खरतडे, शुभम शिंदे, बाबासाहेब व्हनकळस, विजय व्हनकळस, अविनाश शिंदे, सौरभ शिंदे, प्रशांत शिंदे, विनोद शिंदे, हेमंत रामगुडे, गणेश कबाडे, सचिन सौदागर आदींनी परिश्रम घेतले. यासाठी राजाराम शिंदे, भारत रामगुडे, सोमनाथ अहिरे, अभिमान खरतडे, मुत्तप्पा कबाडे, रामा कबाडे, यल्लाप्पा कट्टमणी आदींचे मार्गदर्शन लाभले.
