बार्शी विशेष : आरटीओ ऑफिस, लातूर रोड येथून दुचाकी चोरीला गेली. याबाबतची फिर्याद महादेव रामलिंग मोरे (वय ३५) रा. गोरमाळे, ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
आरटीओ ऑफिस, लातूर रोड, बार्शी येथे कामानिमित्त गेल्यानंतर, हँडल लॉक करून गेटसमोर लावलेली मोटरसायकल (एमएच-१३-डीएच-७५६०) काम संपवून बाहेर येईपर्यंत चोरीला गेली असे फिर्यादीत नमूद केले आहे. ही घटना दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ या दरम्यान घडली.
