दीड लाखाच्या बुलेटची रात्रीतून चोरी; बार्शीच्या लोखंड गल्लीतील घटना

Admin
0

 

Theft of bullets worth 1.5 lakh overnight; The incident in the iron lane of Barshi

बार्शी विशेष : चार महिन्यापूर्वी घेतलेली नवीन बुलेट मोटरसायकल शहराच्या मध्यवर्ती भागातील लोखंड गल्ली येथून चोरीला गेली. या घटनेची फिर्याद गौरी हेमंत येवनकर (वय ३७) रा. ऑक्सिजन पार्क, कासारवाडी रोड, बार्शी यांनी दिली आहे.

फिर्यादींचे बार्शीतील लोखंड गल्ली येथे हेमंत येवनकर एजन्सीज नावाचे हार्डवेअरचे दुकान आहे. दि. २७ जानेवारी रोजी त्या त्यांच्या मुलांसह कामानिमित्त बाहेरगांवी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मुलाने दुकानातील कामगारांकडे सदर बुलेट दिली होती. ती बुलेट कामगार कुमार मोरे याने लोखंड गल्लीतील दुकानासमोर रात्री साडेआठचे सुमारास हँडल लॉक करून लावली व सोबत चावी घेऊन गेला.

फिर्यादी या दि. २८ जानेवारी रोजी सकाळी साडेदहाचे सुमारास दुकानी गेल्या तेव्हा कुमार मोरे व दुकानातील इतर कामगार कामावर आलेले होते. दुकानासमोर लावलेली बुलेट दिसून आली नाही. तेव्हा सर्वांनी मिळून शोध घेतला, परंतु बुलेट मिळून आली नाही.

त्यामुळे दि. २७ च्या रात्री साडेआठ ते २८ जानेवारीच्या सकाळी साडेदहाचे दरम्यान बुलेट चोरीला गेल्याची फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)