अल्पवयीन मुलीस बार्शीतून फूस लाऊन पळवून नेले

Admin
0

 

A minor girl was lured away from Barshi

बार्शी विशेष : बाहेरगांवातून उपजिविकेसाठी बार्शीत येऊन वीटभट्टीवर काम करणाऱ्या कुटुंबातील एका अल्पवयीन मुलीला बार्शीतून पळवून नेल्याची घटना घडली. तशी तक्रार मुलीच्या आईने शहर पोलिसांत दिली आहे.

मूळचे अकलूज येथील रहिवासी असलेले पती व पत्नी बार्शीतील पंकजनगर येथे वीटभट्टीवर मजूरी करून उपजिविका करतात. त्यांची  मुलगी पुण्यातील तिच्या आजीकडे राहून इयत्ता १० वीत शिक्षण घेत होती. पण तेथील पवन हा या मुलीसोबत नेहमी बोलतो म्हणून तिच्या आजीने तिला दोन महिन्यापूर्वी त्या मुलीला बार्शीस तिच्या आईकडे पाठवून दिले होते.

दि. ३१ जानेवारी रोजी ही अल्पवयीन मुलगी शौचास जाऊन येते सांगून सकाळी ६.३०चे सुमारास घरातून निघून गेली. त्यांनतर तिचे आई वडिल वीटभट्टीवर काम करत असताना सकाळी ६.४०चे सुमारास, वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका इसमाने येऊन, तुमची मुलगी एका मुलाच्या मोटरसायकलवर बसून गावातील दिशेने निघून गेल्याचे त्यांना सांगितले. 

त्यामुळे त्या दोघांनी तातडीने बार्शीच्या बस स्थानकावर येऊन तिचा शोध घेतला, पण ती मिळून आली नाही. त्यानंतर नात्यातील एका मुलासोबत मोटरसायकल वरून कुर्डूवाडीपर्यंत जाऊन तेथील रेल्वे स्टेशन व बस स्थानकावर शोध घेतला, तरीही ती मिळून आली नाही. त्यामुळे तिला फूस लावून पळवून नेले असावे अशा संशयावरून तिच्या आईने, पवन  यांच्याविरुध्द बार्शी शहर  पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)