बार्शी विशेष : घरासमोर लावलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना सोलापूर रोडवरील पाटील चाळ येथे घडली. याबाबतची फिर्याद अक्षर प्रभाकर चोरमुले (वय २८) रा. पाटील चाळ, सोलापूर रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
रात्री हँडल लॉक करून घरासमोर लावलेली साठ हजार रूपये किंमतीची मोटरसायकल (एमएच-१३-डीजी-५९८४) चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दि. ३ फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा ते ४ फेब्रुवारीच्या सकाळी सातचे दरम्यान ही घटना घडली.
