शिराळे स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपीस तामिळनाडूतून अटक

Admin
0

 

Main accused in Shirale blast case arrested from Tamil Nadu

बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी फटाके कारखाना स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी नाना शिवाजी पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तामिळनाडू येथून अटक केली आहे.

 दि. १ जानेवारी रोजी बार्शी तालुक्यातील शिराळे पांगरी येथील फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटामुळे लागलेल्या आगीत ५ महिला मृत्यु पावल्या, तर ३ महिला जखमी झाल्या होत्या.

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी नाना शिवाजी पाटेकर, रा. गणेश नगर, उस्मानाबाद हा गुन्हा घडल्यानंतर पळून गेला होता. त्याचा शोध घेवून अटक करण्याबाबत सोलापूर पोलिस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांना आदेशित केले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि धनंजय पोरे यांच्या पथकाला तपास करत असताना, आरोपी नाना शिवाजी पाटेकर हा तामिळनाडू येथे पळून गेल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तामिळनाडू येथे जाऊन भाषेचा अडसर न येऊ देता, कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्ह्यात आरोपी रहात असलेल्या ठिकाणाची माहिती कौशल्याने तपास करून मिळविली. 

मिळालेल्या माहितीप्रमाणे या पथकाने शिवकाशी येथे सापळा रचून, आरोपी नाना शिवाजी पाटेकर याला ताब्यात घेतले.  दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला अटक केली. त्यास न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपीस दि. ८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. 

सदर कामगिरी पोलिस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव यांचे मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुहास जगताप यांचे नेतृत्वाखाली, स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि धनंजय पोरे, सहापोउनि श्रीकांत गायकवाड, पोहकॉ सलीम बागवान, हरिदास पांढरे, पोकॉ समर्थ गाजरे, चालक पोकॉ दिलीप थोरात, व सायबर पोलीस ठाण्याचे पोना मोरे यांच्या पथकाने बजावली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)