वैराग येथील बँकेसमोर लावलेली दुचाकी अर्ध्या तासात पळवली

Admin
0

 

The bike parked in front of the bank at Vairag was run away in half an hour

बार्शी विशेष : मित्राच्या क्रेडिट कार्डचा पिन बदलून बाहेर येईपर्यंत, चोरट्याने बँकेसमोर लावलेली दुचाकी पळवल्याची घटना वैराग येथे घडली.

दि. १८ जानेवारी रोजी दुपारी एकचे सुमारास मित्राच्या क्रेडिट कार्डचा पिन बदलण्यासाठी त्याच्यासोबत बँकेत जातेवेळी, बँकेसमोरच्या मोकळ्या जागेत लावलेली मोटरसायकल, बँकेतील काम करून अर्ध्या तासात बाहेर येईपर्यंत चोरट्याने पळविली. ही घटना वैराग येथील आयसीआयसीआय बँकेसमोर घडली.

याबाबतची फिर्याद सागर दादा मोरे (वय ३१) रा. साकत, ता. बार्शी यांनी वैराग पोलिस ठाण्यात दि. ३ फेब्रुवारी रोजी दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)