बार्शी विशेष : गावातील मित्राकडून कामानिमित्त घेतलेली दुचाकी बार्शीत चोरीला गेल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद विष्णू अण्णा दळवी (वय ४४) रा. खांडवी, ता. बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
फिर्यादींनी गांवातील त्यांचे मित्राकडून मोटरसायकल दि. ३१ जानेवारी रोजी बाहेरगांवी कामानिमित्त जाण्यासाठी घेतली होती.
मोटरसायकलवरून भूम येथे जाऊन तेथील काम झाल्यानंतर, बार्शीतील वडार गल्ली येथील कामासाठी जाताना तेथील दत्त मंदिराजवळ सायंकाळी ५ च्या सुमारास मोटरसायकल लावली.
काम झाल्यानंतर सायंकाळी साडेसहाचे सुमारास मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आल्यानंतर मोटरसायकल तेथे नसल्याचे दिसून आले. त्यानंतर मित्रांसह सर्वत्र शोध घेऊनही ती सापडली नाही त्यामुळे, त्यांनी चोरीची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
