बार्शी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील प्रिंटर चोरीला गेले

Admin
0

 

Printer stolen from Barshi Taluka Health Officer office

बार्शी विशेष : बार्शीतील जवाहर हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातून चोरट्याने प्रिंटर पळविल्याची घटना उघडकीस आली. याबाबतची फिर्याद छाया मारूती मोराळे (वय ३७) रा. दत्त गॅरेज जवळ, कुर्डुवाडी रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

फिर्यादी बार्शीतील जवाहर हॉस्पिटलच्या आवारात असलेल्या, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून काम करतात. दि. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता नेहमीप्रमाणे कार्यालय उघडण्यासाठी गेल्यावर त्यांना मुख्य दाराची एक बाजू तुटलेली दिसल्यामुळे त्यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना फोन करून सदर प्रकार सांगितला.

थोड्या वेळात कर्मचारी तेथे आल्यानंतर त्यांनी कार्यालयात जाऊन पाहणी केली असता, कॅनन कंपनीचा एक व एचपी कंपनीचा एक असे दोन प्रिंटर कार्यालयातून चोरीस गेल्याचे दिसून आले. 

ही घटना ७ फेब्रुवारीच्या सायंकाळी साडेसहा ते ८ फेब्रुवारीच्या सकाळी साडेनऊचे दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)