बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकाच्या आवारातील रिक्षावर, शहर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात, संजय काशिनाथ लाकाळ (रिक्षा क्र.एमएच-१३-सीटी-१७३७), सचिन गोविंद गजाकोश (रिक्षा क्र.एमएच-१३-सीटी-६००५), जीवन हनुमंत मेहेर (रिक्षा क्र.एमएच-१३-सीटी-६८८२), प्रदिप पोपट लोखंडे (रिक्षा क्र.एमएच-१३-सीटी-४४६४) व चेतन नारायण वाघमारे (रिक्षा क्र.एमएच-१३-सीटी-६१३७) यांच्यावर वाहतूकीस अडथळा होईल अशा प्रकारे बस स्थानकाच्या आवारात रिक्षा उभी केल्याचे दिसून आल्यामुळे, भा.दं.वि. १८६० कलम २८३ नुसार कारवाई केली. दि. ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ च्या दरम्यान ही कारवाई करण्यात आली.
बस स्थानकाच्या आवारात बाहेरून बस येताच, रिक्षाचालक आवाराच्या आत येऊन, अगदी बसच्या दारापर्यंत आपल्या रिक्षा आणत असल्याच्या तक्रारी बऱ्याच दिवसांपासून नागरिकांकडून केल्या जात होत्या.
