शहीदांचे स्मारक युवकांसाठी शक्तीस्थळ बनावे : आ. राजेंद्र राऊत

Admin
0

 

Martyrs' memorial should be made a place of power for youth: MLA Rajendra Raut

बार्शी विशेष : बार्शी तालुका शूरवीरांची भूमी असून, इतिहास काळापासून देशासाठी अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. हे स्मारक तालुक्यातील प्रत्येकाचे शक्तिस्थळ बनावे, युवकांनी त्यापासून प्रेरणा घ्यावी, तसेच स्वातंत्र्यलढ्याला शहिदांचा मोठा इतिहास आहे, हा इतिहास भावी पिढीला माहिती होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन आ. राजेंद्र राऊत यांनी केले. बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित शहिद स्मारकाच्या (अमर जवान) भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.

शहिद स्मारकाचा (अमर जवान) भूमिपूजन समारंभ आ. राजेंद्र राऊत यांच्या उपस्थितीत व शहीद पत्नी सुरेखा पन्हाळकर, वीरमाता सखुबाई जाधव, शहीद पत्नी अर्चना काळे, शहीद पत्नी सुनीता शिंदे आणि प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते बार्शीतील भूमी अभिलेख कार्यालयाशेजारी पार पडला.

या कार्यक्रमाला बार्शी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, मा. नगराध्यक्ष आसिफभाई तांबोळी, मा. नगराध्यक्ष रमेश पाटील, मा. नगरसेवक विलास रेणके, मा. नगरसेवक विजय राऊत, नगर अभियंता अजय होनखांबे, माजी सैनिक संघटना अध्यक्ष चांगदेव सुरवसे मेजर तसेच राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर व बार्शी तालुका माजी सैनिक संघटनेचे सर्व संचालक, सभासद उपस्थित होते.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)