बार्शी विशेष : दि. १५ फेब्रुवारी रोजी रात्री दहाचे सुमारास अलिपूर बायपास रोडच्या बाजूला असलेल्या दोन हॉटेल मालकांत भांडण सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून, बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सोपनि परजणे, पोकॉ धुमाळ, मेहेर, भांगे तेथे गेले असता, शेजारी शेजारी असलेल्या दोन हॉटेल मालकांमध्ये शिवीगाळी करून मारामारी सुरू असल्याचे दिसले. पोलिस आल्याचे बघून चौघांपैकी दोन जण अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
सार्वजनिक रस्त्यावर एकमेकांना शिवीगाळ, मारहाण करून सार्वजनिक शांततेचा भंग केला म्हणून, पोकॉ माधव धुमाळ यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून चौघां जणाविरोधात भा.दं.वि. कलम १६० प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.
