बार्शीतील मंदिराबाहेरून भरदुपारी दुचाकीची चोरी

Admin
0

Bike stolen in the afternoon from outside a temple in Barshi

बार्शी विशेष : बार्शीतील भोगेश्वरी मंदिराबाहेर लावलेली दुचाकी भरदिवसा दुपारी चोरीला गेली. याबाबतची फिर्याद फारूक जलील शेख (वय ३३) रा. ४२२, गाडेगांव रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

भोगेश्वरी मंदिरातील बांधकाम करण्यासाठी जाताना शेख यांनी त्यांची मोटरसायकल (क्र. एमएच-१३-डीडी-३०५७) ही मुख्य दरवाजाच्या बाहेर हँडल लॉक करून लावली होती. कामाची सुट्टी झाल्यानंतर मंदिराबाहेर गाडी लावलेल्या ठिकाणी ते आले तेव्हा ती तेथे दिसून आली नाही. 

त्यामुळे कामावरील सहकाऱ्यांसह मोटरसायकलचा सर्वत्र शोध घेतला तरीही ती मिळून आली नाही. ही घटना दि. १२ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते चारच्या दरम्यान घडली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)