बार्शीच्या महाविद्यालयात शिकणारी विद्यार्थीनी बेपत्ता

Admin
0

 

A student studying in a college in Barshi has gone missing

बार्शी विशेष : येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार बार्शी शहर पोलिसात दाखल झाली आहे.

शहरातील एका महाविद्यालयात पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेली ही अल्पवयीन मुलगी दि. ११ जानेवारी रोजी सकाळी साडेआठचे सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून गेली. मुलगी दुपारपर्यंत परत आली नाही, त्यामुळे आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली तेव्हा, ती आज कॉलेजला आली नसल्याचे तिच्याकडून समजले. तिच्या पालकांनी नातेवाईकांकडे चौकशी केली, सर्वत्र शोध घेतला परंतु ती मिळून आली नाही. 

ती मुलगी एका नातेवाईकाच्या मुलाशी नेहमी बोलत असल्यामुळे, त्याने तिला पळवून नेले असावे असा संशय व्यक्त करून पालकांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरिक्षक कर्णेवाड करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)