बार्शी विशेष : बार्शी शहरातून अवघ्या पाच दिवसांत दोन दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत.
पहिल्या घटनेत आईला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात घेऊन जाताना आयटीआय कॉलेज, गाडेगांव रोड समोरील मैदानात हँडल लॉक न करताच लावलेली मोटरसायकल रुग्णालयातून परत येईपर्यंत चोरीस गेली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी २ ते ३ चे दरम्यान घडली. याबाबतची तक्रार गौतम ज्ञानेश्वर काशीद (वय ४२) रा. कोरफळे (कव्हे) ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
तर दुसऱ्या घटनेत शहरातील दत्त भवन हॉटेलमध्ये कामाला जाताना हॉटेलसमोर रोडच्या कडेला हँडल लॉक करून लावलेली मोटरसायकल कामाची सुट्टी होऊन परत येईपर्यंत चोरीस गेली. ही घटना २१ जानेवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ च्या दरम्यान घडली. याबाबतची तक्रार सचिन बाळू नवघन (वय ३५) रा. पाटील चाळ, तुळजापूर रोड, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.
