प्रजासत्ताकदिनी आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या महिलेविरुध्द गुन्हा दाखल

Admin
0

 

A case has been registered against the woman who attempted self-immolation on Republic Day

बार्शी विशेष :  शिवशक्ती बँकेकडून काढलेल्या कर्जाचे हप्ते मागणी करण्यासाठी बँक कर्मचारी वेळोवेळी येत असल्यामुळे कंटाळून पतीने आत्महत्या केली, त्याची तक्रार नोंद व्हावी म्हणून बार्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या उज्वला शशिकांत गोरे (वय ३८) रा. बायपास, बार्शी या महिलेविरुध्द आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

प्रजासत्ताकदिन दि. २६ जानेवारी रोजी उज्वला गोरे यांनी सकाळी आठच्या सुमारास बार्शीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयाबाहेर अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना कॅन व काडीपेटीसह ताब्यात घेतले होते. त्यावेळी त्याठिकाणी कर्तव्यावर असलेल्या महिला पोना रेश्मा सुतार यांनी, या घटनेची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिल्यावरून भा.दं.वि. १८६० कलम ३०९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)