बेंजो वादकाच्या टेंपोमधून चोरट्यांनी चाळीस हजाराचा एम्प्लीफायर पळवला

Admin
0

 

Thieves stole an amplifier worth rs forty thousand from a banjo player's tempo

बार्शी विशेष : बेंजो वादकाच्या लॉक केलेल्या टेंपोमधून चाळीस हजार रुपये किंमतीचा एम्प्लीफायर चोरट्यांनी पळवल्याची घटना शहरातील बारंगुळे प्लॉट येथे घडली.

जमीर दस्तगीर तांबोळी असे या बेंजो व्यावसायिकाचे नांव आहे. जमीर तांबोळी यांचा बेंजो वादनाचा व्यवसाय आहे. सदर व्यवसायाचे साहित्य ठेवण्यासाठी घेतलेल्या टेंपोमध्ये वाद्ये, साऊंड सिस्टिम ठेवून तो बारंगुळे प्लॉट येथील घराजवळच्या स्वस्त धान्य दुकानासमोर पार्किंग करत असतात. दि. २८ जानेवारीच्या रात्री ८ वाजेपर्यंत टेंपो व आतील साहित्य व्यवस्थित असल्याची खात्री केलेली होती.

दि. २९ जानेवारी रोजी एका कार्यक्रमास जाण्यासाठी सकाळी नऊचे सुमारास पार्क केलेल्या टेंपोकडे गेल्यानंतर, त्यांना टेंपोचा दरवाजा उघडा दिसल्यामुळे, आत जाऊन पाहिले असता साऊंड सिस्टिमची वायरिंग तुटलेली दिसली व टेंपोमध्ये बसविलेला एम्प्लीफायर चोरून नेल्याचे आढळून आले. 

दि. २८ जानेवारीच्या रात्री ८ ते २९ जानेवारी सकाळी ८ च्या दरम्यान एम्प्लीफायर चोरीस गेल्याची फिर्याद जमीर दस्तगीर तांबोळी (वय ३५) रा. बारंगुळे प्लॉट, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)