पाहुण्याच्या घरी दुचाकी घेऊन आले अन् चोरांनी ते वाहन पळवले

Admin
0

 

The thieves ran away the bike parked in front of the guest's house

The thieves ran away the bike parked in front of the guest's house

बार्शी विशेष : पाहुण्याच्या घरी दुचाकी  घेऊन आले अन् चोरांनी ते वाहन पळवले असा प्रकार  बार्शी तालुक्यातील शेंद्रीमध्ये घडला.
त्याचे असे झाले की, वडाची वाडी (ता. माढा) येथील रहिवासी रोहिदास प्रभाकर जाधव, वय ४० हे कामानिमित्त बार्शी तालुक्यातील शेंद्रीत राहणारे पाहुणे सर्जेराव उत्तरेश्वर आमले यांच्याकडे आले होते. 

त्यावेळी त्यांची मोटरसायकल त्यांनी आमले यांच्या घरासमोर हँडल लॉक करुन लावली होती. जेवण झाल्यानंतर रात्री साडेअकरा वाजता घराबाहेर येऊन मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी असल्याचेही बघितले होते. 

पुन्हा रात्री दोनच्या सुमारास लघुशंकेसाठी उठल्यानंतर बाहेर येऊन बघितले, तेव्हा मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही, त्यावेळी त्यांनी पाहुण्यांना उठवून ही गोष्ट सांगितली. ही घटना दि. ५ ते ६ जानेवारीच्या रात्री साडेअकरा ते दोनच्या दरम्यान घडली. 

सर्वांनी आसपास व परिसरात शोध घेतला, पण मोटरसायकल सापडली नाही. रोहिदास जाधव यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)