![]() |
बार्शी विशेष : दि. २२ ऑक्टोबर २०२२ रोजी बार्शी तालुक्यातील कोरफळे येथील सिध्देश्वर मस्के व सचिन हागरे यांच्या घरी झालेल्या जबरी चोरी व घरफोडीच्या दोन घटनेत सुमारे १९ तोळे सोने चोरीस गेले होते.
ऐन दिवाळीमध्ये सदर घटना घडल्याने सोलापूर ग्रामीण अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महारुद्र परजणे व पोलिस अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळे पथके तयार करून मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार सदर गुन्हात निष्पन्न झालेले सुनील उर्फ काळ्या श्रावण शिंदे (रा. उस्मानाबाद), रवी उर्फ झोक्या अरुण काळे (रा. देवगांव), किरण अरुण पवार (रा. राळेरास) व अन्य आरोपींकडे तपास करून, सदर गुन्ह्यांत चोरीस गेलेल्या मालांपैकी रुपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल त्यांचेकडून जप्त करण्यात आलेला होता.
सदर मुद्देमाल परत मिळण्याबाबत फिर्यादींनी प्रथम वर्ग न्यायालय बार्शी यांचेकडे अर्ज दाखल केला होता.
त्यानुसार न्यायाधीश पठाण यांनी दिलेल्याआदेशानुसार दोन्ही गुन्ह्यातील मिळून सुमारे ३ लाख ६६ हजार रूपये किंमतीचे ९ तोळे १.५ ग्रॅम सोन्याचे दागिने फिर्यादींना परत देण्यात आले. याबद्दल फिर्यादींनी पोलिस विभागाचे आभार मानले आहेत.
