![]() |
बार्शी विशेष : शहरात चालू असलेल्या कामांचा वेग वाढवण्यासाठी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी नगरपारिषदेच्या कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे सभागृहात नगरपारिषदेचे सर्व खाते प्रमुख अधिकारी यांची आढावा बैठक घेतली.
सदर बैठकीमध्ये बार्शी शहरातील नागरिकांसाठी असलेली स्वच्छता व आरोग्य सुविधा, पाणीपुरवठा, सध्या सुरू असलेली विकासकामे, नव्याने सुरू होणारी रस्ते-गटारी, बगिचा यांची कामे, व्यापारी संकुले आदी कामकाजासंदर्भात आढावा घेतला.
या बैठकीत आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, मिळकत विभाग, कर विभाग आदींच्या सध्याच्या परिस्थितीतील कामकाजाची माहिती अधिका-यांमार्फत घेण्यात आली.
यानंतर आमदार राजेंद्र राऊत यांनी प्रत्येक खात्याच्या अधिका-यांना कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना करून कामकाज गतीमान करण्यास सांगितले. नवीन कामे लवकरात लवकर सुरू करून नागरिकांना रस्ते वापरता यावे यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
या आढावा बैठकीस मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, उप मुख्य अधिकारी शिवाजी कांबळे, नगर अभियंता अजय होनखांबे, करवसुली निरीक्षक भगवान बोकेफोडे, मुख्य लेखापाल मिनाक्षी वाकडे व इतर प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
