बार्शी तालुक्यातील सर्जापूरातील सावकाराच्या घरी धाड

Admin
0

 

Raid at the moneylender's house in Sarjapur in Barshi taluka

Raid at the moneylender's house in Sarjapur in Barshi taluka

बार्शी विशेष : बार्शी तालुक्यातील सर्जापूर येथील नितीन गोरख राऊत यांच्या राहत्या घरी, बार्शी तालुक्याचे सहाय्यक निबंधक जे. एस. दडस यांच्या नेतृत्वाखालील पथकाने धनाजी ज्ञानोबा माने, रा. कौठाळी, ता. उत्तर सोलापूर यांचेकडील तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अवैध सावकारी अंतर्गत ही धाड टाकली. 

यावेळी घर झडतीमध्ये पथकाकडून कोरे चेक, कोरे स्टॅम्प, खरेदी खते व आर्थिक नोंदी असलेल्या वह्या इत्यादी कागदपत्रे जप्त करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम२०१४  नुसार गुन्हा दाखल करण्यात येईल. 

ही धाडीची कारवाई सहाय्यक निबंधक कार्यालयातील सचिन महाडिक, सौ. पी. आर. स्कंद, उमेश मुसळे, व्ही. जे. गौड, सुहास राऊत व प्रांजली झालटे, तसेच वैराग पोलीस ठाणे येथील ए. आर. अवघडे, एम. एस. सलगर, जी. बी. जाधवर या कर्मचाऱ्यांनी केली.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)