डोक्यात वीट मारून जखमी केले; पती पत्नीने दिल्या परस्परविरोधी तक्रारी

Admin
0

 

Injured by a brick on the head; Conflicting complaints filed by husband and wife

बार्शी विशेष : आपल्या डोक्यात वीट मारून जखमी केले, अशा परस्परविरोधी तक्रारी पतीने  व पत्नीने बार्शी शहर पोलिसांत दिल्या आहेत.

माझ्या पतीस दारूचे व्यसन असून, मला चारित्र्याच्या संशयावरून नेहमी त्रास देतात. २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमरास घरात मी, मुलगी व नातेवाईक असे बसले असताना, बाहेरून घरात आलेल्या पतीने तुझ्याविषयी लोक काहीही बोलतात, तू नीट वागत नाहीस असा चारित्र्याविषयी संशय घेऊन, शिवीगाळी करत माझ्या डोक्यात वीट मारून जखमी केले, अशी फिर्याद पत्नीने पतीविरुध्द दिली आहे.

तर दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरात मी, पत्नी, मुलगी व नातेवाईक असताना, पाणी घेताना माझ्याकडून थोडे पाणी खाली सांडले या कारणावरून पत्नीने मला शिवीगाळी करून घराबाहेर ढकलून दिले. मी घरात जाण्याचा प्रयत्न केला असता, पत्नीने मला वीट फेकून मारली, ती कपाळावर लागून मला जखम झाली अशी फिर्याद पतीने पत्नीविरुध्द दिली आहे.

श्रीकांत रावसाहेब अंधारे (वय ४३) व त्यांच्या पत्नीने (दोघेही रा. बाशिंगे प्लॉट, परांडा रोड, बार्शी) बार्शी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रारी दिल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)