![]() |
बार्शी विशेष : कुर्डुवाडी रोडवरच्या छत्रपती कॉलनीतील एजन्सी समोर असलेल्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली.
नितीन गोविंद बनसोडे (वय ३९) रा. अलिपूर रोड, व्हनकळस प्लॉट, बार्शी हे, आपटे एजन्सी, छत्रपती कॉलनी, कुर्डुवाडी रोड येथे दुपारी कामासाठी आले तेव्हा एजन्सी समोर असलेल्या पार्किंगमध्ये त्यांनी मोटरसायकल हँडल लॉक करून लावली व कामानिमित्त ते बाहेरगांवी गेले.
रात्री परत आल्यानंतर मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही, व शोध घेऊनही सापडली नाही. ही घटना १२ जानेवारीच्या दुपारी ३ ते रात्री १० चे दरम्यान घडली. नितीन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
