बार्शी विशेष : उडान फाउंडेशनने दरवर्षीप्रमाणे २६ जानेवारी रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यामध्ये १७७ जणांनी रक्तदान केले. शिबिरात जमा होणाऱ्या रक्तसाठ्याचा काही भाग गरीब,गरजू रुग्णांच्या उपचारासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. सामान्य नागरिकांना हा मदतीचा हात आहे, असे फाउडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शिबिराचे रक्तसंकलन मल्लिकार्जुन ब्लड सेंटर, सोलापूर यांनी केले, तसेच या शिबिरात महिला व अपंग व्यक्तिंनीही सहभाग नोंदवून हम भी कुछ कम नहीं हे दाखवून दिले.
या रक्तदान शिबिरास आमदार राजेंद्र राऊत, बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अविनाश जाधव, डॉ. अमित पडवळ, बालरोग तज्ञ डॉ.संदीप पाटील, डॉ.मौला शेख, डॉ.अरिफ शेख, उडान फाउंडेशनला मार्गदर्शन करणारे सचिन वायकुळे, प्रशासन अधिकारी अनिल बनसोडे, नगरसेवक कय्यूम पटेल, कॉ. प्रवीण मस्तूद आदि मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी उडान फाउंडेशनचे अध्यक्ष इरफान शेख, उपाध्यक्ष जाफर शेख व इलियास शेख, सल्लागार शब्बीर वस्ताद, इन्नुस शेख अय्यूब शेख, सचिव जमील खान, कार्याध्यक्ष शकील मुलानी, खजिनदार शोएब काझी, नगरपरिषदेचे माजी अभियंता समशेर पठाण, मोईन नाईकवाडी, तौसीफ बागवान, परवेझ शेख, साजन शेख, मोहसीन पठाण, हाजी राजू शिकलकर, रॉनी सैय्यद, मुन्ना बागवान, समीर शेख, अमजद शेख, सलीम चाचा चौधरी, इरफान, अॅड. रियाज शेख, अल्ताफ शेख, वसीम मुलानी, जमीर तांबोळी, रियाज बागवान, सादिक रेडियटर, हाजी उस्ताद, एस. बी. डेरीवाले, गुड्डू बागवान, मोहसीन दिल्लीवाले, अकील मुजावर यांनी परीश्रम घेतले.
