लग्न लावायला आत गेले अन् चोराने दुचाकी वाहन पळविले

Admin
0

 

Barshi Vishesh: Went inside to get married and the thief stole the two wheeler. Incident in the marriage hall near Barshi
Went inside to arrange marriage and the thief stole the two-wheeler

बार्शी विशेष : साडूच्या मुलीच्या विवाह समारंभासाठी मंगल कार्यालयात गेले अन्, मंगल कार्यालयाच्या गेटच्या आत लावलेले दुचाकी वाहन चोराने पळविले असा प्रकार नुकताच घडला. बप्पा कोंडिबा आगलावे (वय 57), रा. बावी (आ) ता. बार्शी यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत माहिती अशी की,  बप्पा आगलावे यांच्या साडूच्या मुलीचे लग्न दि. २९ नोव्हेंबर रोजी  बार्शी कुर्डुवाडी रस्त्यावरील (मौजे तावरवाडी) येथील एका मंगल कार्यालयात होते. त्या लग्नाला जाण्यासाठी ते बावी येथून त्यांची हिरो स्प्लेंडर मोटरसायकल (क्र. एमएच-13-एए-7554) ही घेऊन गेले होते. तेथे गेल्यानंतर त्यांनी मोटरसायकल मंगल कार्यालयाच्या आतील गेटच्या उजव्या बाजूस सायंकाळी सहाचे सुमारास हँडललॉक करुन उभी केली. 

विवाह समारंभ आटोपल्यानंतर रात्री नऊचे सुमारास घरी परत जाण्यासाठी मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी ते आले असता, त्यांना मोटरसायकल तेथे दिसून आली नाही. त्यामुळे मंगल कार्यालयाच्या परिसरात आत बाहेर शोध घेतला. तसेच आसपासच्या गावांत, त्यांनी  भाऊ व पुतण्या यांच्यासह शोध घेऊनही ती सापडली नाही. त्यामुळे दि. 2 डिसेंबर रोजी बार्शी तालुका पोलिस ठाण्यात मोटरसायकल चोरीस गेल्याची फिर्याद दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)