![]() |
बार्शी विशेष : तालुक्यातील 22 गावांमध्ये होत असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत गुरुवारपर्यंत 101 अर्ज दाखल झाले आहेत त्यात सरपंच पदासाठी २२ तर ग्रामपंचायत सदस्यासाठी ७९ अर्ज दाखल झाले आहेत.
आत्तापर्यंत अर्ज दाखल झालेल्या अर्जामध्ये मांडेगाव सरपंच पदासाठी २ व सदस्यासाठी २, मिर्जनपूर सरपंच पदासाठी ३, राळेरास सरपंच पदासाठी १ व सदस्यासाठी १०, येळंब सरपंच पदासाठी २ व सदस्यासाठी ५, इरले सरपंच पदासाठी २ व सदस्यासाठी १२, हत्तीज सरपंच पदासाठी ३ व सदस्यासाठी ११, शेलगांव (मा) सदस्यासाठी ४, तर उंबरगे सदस्यासाठी २ असे अर्ज दाखल झाले आहेत.
तर बेलगांव, पुरी, संगमनेर, मालेगांव (आर), गाडेगांव व चिंचखोपण या सहा गावांतून एकही अर्ज दाखल झालेला नाही. शुक्रवार २ डिसेंबर हा अर्ज दाखल करण्यासाठीचा शेवटचा दिवस आहे.
