![]() |
बार्शी विशेष : (Barshi Taluka Gram Panchayat election) तालुक्यात होत असलेल्या 22 गावांमधील ग्रामपंचायत निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसांपर्यंत एकूण 592 अर्ज दाखल झाले असल्याची माहिती तहसिलदार सुनिल शेरखाने यांनी दिली.
यामध्ये 22 सरपंचपदासाठी 110 अर्ज तर 163 सदस्यपदांसाठी 482 अर्ज दाखल झाले आहेत. यंदापासून ग्रामपंचायत निवडणूकीसाठी सरपंचाची निवड थेट मतदारच करणार आहेत.
दाखल झालेल्या अर्जाची यादी (ग्रामपंचायत, सरपंचपद, सदस्यपद) या क्रमानुसार अशी,
ज्योतीबाची वाडी 5-41, शेलगांव (मा) 9-19, बेलगांव 3-19, पुरी 7-12, झाडी 4-22, बोरगांव 7-19, येळंब 1-10, भांडेगांव 7-33, इर्ले 5-33, काळेगांव 3-24, देवगांव 1-10, रस्तापूर 9-20, संगमनेर 3-15, मिर्झनपूर 1-22, मांडेगांव 10-24, रऊळगांव 4-27, मालेगांव (आर) 4-22, गाडेगांव 1-7, चुंब 5-24, उंबरगे 5-23, हत्तीज 3-11 तर राळेरास 6-34.
हे ही वाचा : बार्शी तालुक्यातील 22 ग्रामपंचायतीसाठी एकूण 101 अर्ज दाखल
जाहिर झालेल्या निवडणूकीच्या कार्यक्रमानुसार 22 ग्रामपंचायतीच्या 66 प्रभागासाठी ही निवडणूक होत असून यामधून 22 सरपंच आणि 163 सदस्य निवडले जाणार आहेत. दाखल अर्जांची छाननी 5 डिसेंबर रोजी होणार आहे, तर 7 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतर निवडणूक चिन्हांचे वाटप करुन त्याची यादी जाहिर केली जाणार आहे अशी माहितीही तहसिलदार सुनिल शेरखाने यांनी दिली.
.png)