| Distribution of blankets by Rangandharva to homeless underprivileged people |
बार्शी विशेष : सध्याच्या वाढत्या थंडीमध्ये प्रत्येकजण थंडीपासून आपला बचाव करताना दिसत आहे. पण जे लोक बेघर आहेत, ज्यांना कोणीही आपलं माणूस नाही, अशा लोकांचं काय? याचा विचार बार्शीतील रणगंधर्व पथक या सामाजिक जाण असणाऱ्या प्रतिष्ठानने केला.
या पथकातील सदस्यांनी स्वखर्चाने व सुलाखे डॉटर्स यांच्या साह्याने बार्शीतील डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटल, कॅन्सर हॉस्पिटल याठिकाणी तसेच लातूर रोड, शनी मंदिर पूल, भगवंत मंदिर व एसटी स्टँड येथे रत्यावर राहणाऱ्या वंचित घटकांना ब्लँकेट वाटप करुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.
यासाठी प्रतिष्ठानच्या अजिंक्य कोल्हे, ईश्वर साखरे, विजय काकडे, ऋषी डोंगळे, ओंकार डोके, प्रवीण जावीर, रोहन चौधरी, प्रणव चौधरी, आकाश देशमुख, राकेश कसबे, मयूर फराडे, लखन जाधव, स्वप्निल व्हाळे, मयूर जाधव, शुभम शेटे, गजानन काटकर, सागर लोखंडे, कपिल सरवदे, सागर वायकुळे, आशिष जंगम, अभी गायकवाड, प्रकाश जाधव, सचिन परदेशी, आदित्य ज्ञानमोठे, निखिल काकडे, संकेत राऊत, विशाल जमदाडे, सुरज पोफळे, मंगेश दहीहांडे, किशोर चव्हाण, रोहन खंबाळे, विजय चव्हाण, अक्षय बारगुळे, निखिल कानडे, समर्थ सुरवसे यांनी परिश्रम घेतले.

