![]() |
| Only Samaj Seva Sanstha gave groceries to a needy woman |
बार्शी विशेष : बार्शी शहरात विविध संस्था सामाजिक कार्य करत आहेत. त्यापैकीच ओन्ली समाज सेवा बहुउद्देशिय संस्था ही एक.
सुभाषनगर येथील एका महिलेला मदतीची गरज असल्याची माहिती या संस्थेला नुकतीच मिळाली. त्यानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याबाबत माहिती घेऊन, दत्त जयंतीचे निमित्त साधत सौ. कुसूम फुटाणे या गरजू महिलेला एक महिना पुरेल इतके किराणा साहित्य देऊन समाजसेवेची संस्थेची परंपरा कायम राखली.
यासाठी संस्थेला अग्रवाल स्विट होमचे विशाल अग्रवाल यांचे विशेष सहकार्य लाभले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राहुल वाणी, पदाधिकारी व इतर सदस्य उपस्थित होते.
