![]() |
| Two brothers beaten up for not paying for drinking |
बार्शी विशेष : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने दोन भावांना मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद तेजस प्रकाश निचळ (वय 24) रा. लहुजी वस्ताद चौक, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
शहरातील लहुजी वस्ताद चौकात असलेल्या दूध डेअरीमध्ये फिर्यादीचा भाऊ आकाश हा काम करत असताना, शेजारी रहाणारा मयूर जाधव हा तेथे येऊन दारुच्या नशेत आकाशला दारु पिण्यासाठी पैसे मागू लागला.
त्यावेळी आकाशने त्यास नकार दिला असता, त्याने शिवीगाळी करण्यास सुरुवात केली, तेव्हा फिर्यादीने शिव्या का देतो अशी विचारणा करताच, मयूरने फिर्यादीला शिवीगाळ करुन तेथे पडलेल्या फरशीचा तुकडा उचलून डोक्यात व हातावर मारुन जखमी केले. त्यावेळी आकाश भांडण सोडवित असताना, त्यालाही लाथाबुक्क्याने मारहाण केली.
ही घटना दि. 8 डिसेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास घडली.
