![]() |
| Thieves stole seventeen thousand rupees from an old woman by cutting the bag |
बार्शी विशेष : बँकेतून काढलेली रक्कम ठेवलेली पिशवी कापून चोरट्याने वृध्द महिलेचे सतरा हजार रुपये पळविल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद कलावती लिंबाजी पिसाळ (वय 82), रा. पिंपळगाव (पा), ता. बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.
कलावती पिसाळ यांनी दि. 8 डिसेंबर रोजी तुळजापूर रोडवरील जिल्हा मध्यवर्ती बँकेतून एकोणीस हजार रुपये काढले. त्यापैकी दोन हजार रुपये मोबाईल घेण्यासाठी बाजूला काढून उरलेले सतरा हजार रुपये प्लॅस्टिक पिशवीत ठेवले.
बार्शी बस स्थानकाजवळच्या अपूर्वा मोबाईल शॉपीमध्ये मोबाईल घेतला. त्यानंतर एसएस अॅग्रो येथे भुईमुगाच्या बियाणांची चौकशी करुन नंतर भगवंत किराणा येथून किराणा माल खरेदी केला. त्यावेळी तेथे पैसे देण्यासाठी पिशवी उघडली असता, पिशवी कापलेली दिसली आणि त्यामध्ये ठेवलेल्या सतरा हजार रुपये किंमतीच्या 200 रुपयांच्या 85 नोटाही दिसून आल्या नाहीत.
ही घटना दि. 8 डिसेंबरच्या दुपारी एक ते चारच्या दरम्यान घडली. बार्शी शहर पोलिस पुढील तपास करत आहेत.
