![]() |
| Husband stabs wife at home; Shocking incident in Barshi |
बार्शी विशेष : रोज दारु पिऊन पती मारहाण करत असल्याने माहेरी आई वडिलांचे घरी रहाणाऱ्या विवाहितेवर, पतीने बार्शीत येऊन चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना घडली. पिडीत विवाहितेने याबाबत बार्शी पोलिसात फिर्याद दिली आहे.
पिडीत विवाहितेचे लग्न पाच वर्षापूर्वी झाले असून, तिचा पती बीडमधील एका बिअर बारमध्ये कामास आहे. पती रोज दारु पिऊन मारहाण करत असल्यामुळे एक महिन्यापासून ती सध्या बार्शीत माहेरी रहात असून, तिने सोडचिठ्ठीसाठी दावाही दाखल केलेला आहे.
दि. 8 डिसेंबर रोजी तिचे आई वडिल कामानिमित्त बाहेरगांवी गेले होते. त्यावेळी सायंकाळी पाचचे सुमारास तिचा पती बार्शी येथे तिच्या घरी आला, व त्याने तुला जीवे मारुन टाकतो म्हणत, कमरेला असलेला चाकू काढून तिच्या दोन्ही हातावर, दंडावर व मांडीवर वार केले. त्यावेळी तिने आरडाओरडा केल्यामुळे तो पळून गेला. त्यानंतर गल्लीतील लोक जमा झाले. तिची बहिण व तिच्या पतीने जखमी पिडीतेला रिक्षातून पोलिस ठाण्यात नेले. तिच्यावर सरकारी दवाखान्यातून उपचार करण्यात आले.
तिने दिलेल्या फिर्यादीनुसार तिच्या पतीविरुध्द भा.दं.वि. १८६० कलम 323, 326 व 506 कलमानुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
