![]() |
बार्शी विशेष : मार्केट यार्डात दुकानासमोर लावलेली मोटरसायकल चोरट्याने भरदिवसा पळविल्याची घटना घडली. याबाबतची फिर्याद प्रेमजी मंगलदास भानुशाली (वय 44) रा. सुभाषनगर, बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
भानुशाली यांनी शनिवार दि. ३ डिसेंबर रोजी त्यांची मोटरसायकल नेहमीप्रमाणे दुकानासमोरील पार्किंगमध्ये हँडल लॉक करुन सकाळी नऊचे सुमारास लावली होती. दुपारी चारचे सुमारास घरी जाण्यासाठी ते दुकानाबाहेर आले असता त्यांना मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी दिसून आली नाही. म्हणून त्यांनी आजूबाजूला तसेच बार्शी शहर व परिसरात शोध घेतला, तरीही ती मिळून न आल्याने त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हे वाचा : फेब्रुवारी 2022 पासून एक डझनहून अधिक मोटरसायकल गेल्या चोरीला
बार्शी शहर परिसरातून आजवर अनेक मोटरसायकल चोरीस गेल्या आहेत. पण अद्यापही त्यांचा तपास लागलेला नाही. अशातच शनिवार हा बाजार दिवस असताना, सतत वर्दळ असणाऱ्या मार्केट यार्डातून भरदिवसा मोटरसायकल चोरीस गेली यावरुन चोरट्यांचे साहस अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे.
.jpg)