![]() |
| The nuisance of stray dogs has increased in Barshi city |
बार्शी विशेष : बार्शी शहरात भटक्या, मोकाट कुत्र्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. दुचाकी चालकांवर मोकाट कुत्रे भुंकत येण्यामुळे व अचानकपणे वाहनांसमोर आडवे येण्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे.
या कुत्र्यांच्या झुंडीपासून महिला, वृध्द नागरिकांना आणि विशेषतः लहान मुले व शालेय विद्यार्थ्यांना अधिक धोका होण्याचा संभव आहे. कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्यामुळे लहान मुले जखमी झाल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहे.
हे वाचा : शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा
यासंदर्भात शहरातील नागरिकांनी तसेच राजकीय पक्ष, संघटनांनी बार्शी नगरपरिषदेस अनेकदा निवेदने देऊन मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केलेली आहे. परंतु त्यावर अद्याप काहीही कार्यवाही झाली नसल्याने, एखादी अप्रिय घटना घडल्यावरच प्रशासन याकडे लक्ष देणार आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे.


