किराणा दुकानाच्या शटरची कुलूपे काढून रक्कम लंपास

Admin
0

 

The lock of the shutters of the grocery shop was removed and the amount was looted

The lock of the shutters of the grocery shop was removed and the amount was looted

बार्शी विशेष : किराणा दुकानाच्या शटरची कुलूपे काढून चोरट्यांनी गल्ल्यातील रक्कम लंपास केली. रामलिंग धोंडिबा देशमाने (वय ५८) रा. परदेशी प्लॉट, येडाई विहिरीजवळ, बार्शी यांनी या चोरीची फिर्याद बार्शी शहर पोलिसांत दिली आहे.

टिळक चौक नागोबा मंदिरामागे झाडबुके मैदान येथे देशमाने यांचे किराणा दुकान आहे. दि. १८ डिसेंबरच्या रात्री शटरला कुलूपे लाऊन नेहमीप्रमाणे दुकान बंद करुन रात्री नऊ वाजता ते घरी गेले.

दुसऱ्या दिवशी दि. १९ डिसेंबर रोजी सकाळी सातचे सुमारास दुकान उघडण्यास गेले तेव्हा, शटरला लावलेली कुलूपे दिसली नाहीत. त्यामुळे त्यांनी त्यांचे मेहुणे सोमनाथ बुरांडे यांना ही गोष्ट सांगितली.

त्या दोघांनी दुकान उघडून पाहणी केली असता, गल्ला उघडा दिसला व त्यामध्ये दूध, बेकरी मालाचे बिल देण्यासाठी ठेवलेले एकवीस हजार रुपये चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)