लघुशंकेसाठी थांबल्यावर मोबाईल व पाकिट लुटले; लातूर बायपास जवळची घटना

Admin
0

 

Mobile and wallets were looted after stopping to urinate at the bypass

Mobile and wallets were looted after stopping to urinate at the bypass

बार्शी विशेष : दुचाकीवरुन गावाकडे परत जाताना लघुशंकेसाठी थांबल्यावर अज्ञात इसमांनी मोबाईल तसेच रोख नऊ हजार रुपये, एटीएम कार्ड, आरसी बुक व लायसेन्ससह पाकिट  लुटल्याची घटना बार्शी तालुक्यातील अलीपूर शिवारात घडली. याबाबतची फिर्याद सिराज इन्नुस शेख (वय २७) रा. गुळपोळी ता. बार्शी यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

सिराज शेख हे दि. १५ डिसेंबर रोजी हिंगणगाव ता. परांडा येथील काम आटोपून सायंकाळी गावाकडे परत निघाले होते. रात्री आठचे सुमारास बार्शी लातूर बायपास रोडवरील नेवाळे यांच्या खुले प्लॉटींग बोर्ड लावलेल्या ठिकाणी ते दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेले. 

त्यावेळी समोरुन अंधारातून एक इसम आलेला दिसला. त्याला कोण आहे असे विचारताच त्याने त्यांना ढकलून खाली पाडले आणि हातातील मोबाईल हिसकावून घेतला. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या आणखीन एका इसमाने पाठीमागून पकडून दोघांनी त्यांच्या खिशातील नऊ हजार रुपये, चार एटीएम कार्ड, दुचाकीचे आरसी बुक व लायसेन्ससह असेलेले पाकिट जबरदस्तीने काढून घेतले आणि ओरडलास तर तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. 

त्यावेळी तेथे अजून एक इसम मोटरसायकल घेऊन आला, तेव्हा ते दोघेजण त्याच्या मागे बसून निघून गेले. त्या मोटरसायकलवर एमएच-१३-डीपी-८३१३ असा नंबर ब्रेकलाईटच्या उजेडामुळे त्यांना दिसला. याच ठिकाणी माझे परिचित श्रीकांत दशरथ देवकते रा. जामगांव, ता. बार्शी यांचाही मोबाईल चोरट्यांनी पळविल्याचे समजले, असेही शेख यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

सदर फिर्यादीनुसार बार्शी तालुका पोलिस ठाण्यात तीन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)