मुलीला लपवून ठेवल्याच्या संशयावरुन तरुणास मारहाण

Admin
0

 

A young man was beaten up on the suspicion of hiding the girl

A young man was beaten up on the suspicion of hiding the girl

बार्शी विशेष : मुलीला कुठे तरी लपवून ठेवल्याच्या संशयावरुन तरुणास मारहाण करण्यात आल्याची फिर्याद दाखल झाली आहे. फिर्यादीचे गल्लीतील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. पण तिचे लग्न झाल्यानंतर तिच्याशी संबंध तोडले होते असे फिर्यादीचे म्हणणे आहे. 

दि. १८ डिसेंबर रोजी रात्री आठच्या सुमाराला फिर्यादी मित्रासोबत बोलत उभा असताना माझी मुलगी घरी नाही, तिला तू कुठे लपवून ठेवले आहे सांग, असे म्हणून गल्लीतील तिघा जणांनी मला लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये डोक्यात काठी लागल्याने रक्तस्त्राव होऊन कानामागे जखम झाली. अशी फिर्याद सोनू सुरेश जाधव (वय २२) रा. मांगडे चाळ, बार्शी याने तिघा जणांविरोधात बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)