वृक्ष संवर्धन समितीच्या नूतन दिनदर्शिकेचे प्रकाशन

Admin
0

 

Publication of new Calendar of Tree Conservation Committee Barshi

Publication of new Calendar of Tree Conservation Committee Barshi

बार्शी विशेष : वृक्ष संवर्धन समिती, बार्शी निर्मित नूतन वर्ष २०२३ च्या दिनदर्शिकेचे प्रकाशन डॉ. प्रशांत मोहिरे, उद्योजक प्रशांत पैकीकर, गौतमभाई कांकरीया, बार्शी नगरपरिषदेचे आरोग्याधिकारी शब्बीर वस्ताद, पत्रकार सचिन वायकुळे, गणेश गोडसे, प्रा. शशीकांत धोत्रे, हेल्थ क्लबचे भगवान लोकरे यांच्या हस्ते करण्यात आले. 

कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना, या दिनदर्शिकेत जागतिक दिन, देशी वृक्षांची माहिती, पर्यावरण विषयक सुविचार यासोबत स्थानिक संस्था, संघटनांचे वर्धापनदिन, थोर व्यक्तिंचे जयंतीदिन अशा उपयुक्त माहितीचा समावेश केल्याचे समितीचे अध्यक्ष उमेश काळे यांनी  सांगितले. 

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रशांत मोहिरे, शब्बीर वस्ताद, सचिन वायकुळे यांनी समितीच्या कार्याची प्रशंसा केली. 

कार्यक्रमांसाठी विविध क्षेत्रातील नागरिक, पत्रकार, समिती सदस्य आणि महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वीरेंद्र भंडे यांनी केले तर महेश बकशेट्टी यांनी आभार मानले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)