बार्शीच्या बंद घरातील वस्तू आणि बंद टपरी चोरीस गेल्याची तक्रार

Admin
0

 

Complaint of theft of household goods and tapri from closed house

Complaint of theft of household goods and tapri from closed house

बार्शी विशेष : बंद घराचे कुलूप तोडून घरातील गृहोपयोगी साहित्य तसेच घरासमोरील बंद पान टपरी चोरीस गेल्याची तक्रार बालाजी सिध्देश्वर शेडापे (वय 28) रा. सिध्देश्वर नगर, बार्शी (सध्या रा. वडगांव शेरी, पुणे) यांनी शहर पोलिसात दिली आहे.

बालाजी शेडापे हे बार्शीतील सिध्देश्वर नगर येथील दोन खोल्यामध्ये रहात होते. 2007 पासून व्यवासायानिमित्त ते पुणे येथे रहात असून, बार्शीतील दोन खोल्यामध्ये त्यांनी गृहोपयोगी साहित्य ठेवलेले होते. तेथे ते अधून मधून ये जा करत असतात.

दि. 9 फेब्रुवारी 2022 रोजी रहात्या घरास कुलूप लाऊन ते पुणे येथे गेले होते. त्यानंतर 8 मे रोजी कामानिमित्त बार्शी येथे आले तेव्हा त्यांच्या रहात्या घराचे कुलूपाऐवजी दुसरेच कुलूप दिसून आले. ते कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता त्यांना घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडलेल्या दिसून आल्या, तसेच घरातील पितळी भांडी, चांदीचे देव, दोन जुने टीव्ही, एक सायकल व घरासमोर असलेली बालाजी पान सेंटर नावाची लाकडी टपरी अश्या अंदाजे साडेबारा हजार रुपयांच्या वस्तू चोरीस गेल्याचे आढळून आले. 

याबाबत नातेवाईकांवर संशय व्यक्त करुन, 9 फेब्रुवारी ते 8 मे 2022 च्या दरम्यान ही चोरी झाल्याची फिर्याद त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)