भांडण सोडविण्यासाठी गेल्यामुळे मारहाण; बार्शीच्या चोरमुले प्लॉट येथील घटना

Admin
0

 

Beating for going to settle a fight; Incident at Barshi's Chormule Plot

Beating for going to settle a fight; Incident at Barshi's Chormule Plot

बार्शी विशेष : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मित्राला का मारता असे विचारल्यामुळे पाच सहा जणांनी मिळून मला मारहाण केली अशी तक्रार कैफ समीर तांबोळी (वय १७) रा. नाळे प्लॉट, बार्शी यांनी शहर पोलिसात दिली आहे.

कैफ तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आपण चोरमुले प्लॉट येथे जाऊन येवू असे माझा मित्र उमेश ननवरे म्हणाला, म्हणून आम्ही दोघे दि. १६ डिसेंबरच्या रात्री १० चे सुमारास माझ्या मोटरसायकलवरुन चोरमुले प्लॉट येथे गेलो. त्यावेळी तेथे विशाल कटके व इतर पाच मुलांचे भांडण चालू होते. 

त्यांचे भांडण सोडविण्यासाठी उमेश गेला असता, त्याला त्या मुलांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी उमेशला का मारता असे म्हणून भांडण सोडविण्यासाठी मी गेलो असता, तुझा काय संबंध, तू इथे कशाला आला असे म्हणून विशाल कटके याने मला लाकडी दांडक्याने कपाळावर मारुन जखमी केले, तसेच त्याच्या भावाने गमज्याने तोंड दाबून, गळ्याला धरुन मला खाली पाडून त्याने व इतर चार अनोळखी मुलांनी शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, व पुन्हा आमच्या वाटेला गेलास तर जीवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. तसेच माझ्या मोटरसायकलची मोडतोड करुन नुकसान केले.

या फिर्यादीनुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात विशाल कटके, त्याचा भाऊ व इतर चार अनोळखी व्यक्ती विरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)