![]() |
बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलिसांनी चारे शिवारातील ओढ्यातून अवैधरित्या वाळू काढत असताना एक ब्रास वाळू आणि जेसीबी असा सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
बार्शी तालुक्यातील चारे शिवारातून ओढ्यातील वाळू अवैधरित्या काढली जात असल्याची खबर मिळताच, तालुका पोलिसांचे पथक तेथे पोहोचले.
पोलिस आल्याचा जेसीबी चालकाला सुगावा लागल्याने तो जेसीबी तेथेच सोडून पळून गेला. त्यावेळी पोलिसांनी त्याठिकाणी पंचनामा करुन साडेसात हजार रुपये किंमतीची एक ब्रास वाळू व सहा लाख रुपये किंमतीचा जेसीबी असा माल जप्त केला. २३ डिसेंबर रोजी ही कारवाई करण्यात आली.
पो.कॉ. शंकर वाघमारे यांनी जेसीबी मालक प्रशांत प्रकाश जगदाळे, रा. चारे व नांव, पत्ता माहित नसलेल्या जेसीबी ऑपरेटर यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
