रणजितसिंह शिंदे यांच्यासह सात जणांविरुध्द वैराग पोलिसांत गुन्हा दाखल

Admin
0

 

A case has been registered against seven people including Ranjit Singh Shinde in Vairag police station

A case has been registered against seven people including Ranjit Singh Shinde in Vairag police station

बार्शी विशेष : साखर कारखान्याकडून येणे असलेल्या उस बिलाची रक्कम न देता, जामिन नसलेल्या कर्ज प्रकरणात ती जमा केल्याचे सांगून बिलाच्या रकमेचा अपहार केल्याचा आरोप एका सभासदाने केल्याप्रकरणी, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांच्यासह सात जणांविरुध्द वैराग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

इंडियन शुगर लि. कारखान्याचे (सध्याचे नाव बबनरावजी शिंदे शुगर अँड अलाईड इंडस्ट्रीज लि. तुर्क पिंपरी, ता. बार्शी) सभासद उपळे दु. येथील शेतकरी मिलीद नामदेव काळे यांनी, सन 2021-22 च्या हंगामात कारखान्याकडे गाळपांस घातलेल्या उसाचे बिल 3,13,554 रुपये मिळण्याची मागणी केली असता, कारखान्याने रक्कम देण्यास टाळाटाळ करुन,  ठिबक सिंचन संचाचे 80 हजार रुपयांच्या कर्ज प्रकरणास आपण जामिनदार असल्यामुळे व कर्जदाराने ती रक्कम न भरल्यामुळे आपल्या बिलाची रक्कम त्या कर्जापोटी जमा करुन घेतल्याचे सांगितले.

त्यावर, सुहास अशोक बुरगुटे, विजयकुमार वैजिनाथ धनवे (तत्कालीन बीट प्रमुख), औदुंबर धनाजी कदम (तत्कालीन अॅग्री ऑफिसर), कैलास बा. मते (तत्कालीन जनरल मॅनेजर), रणजीतसिंह बबनराव शिंदे (चेअरमन),  तत्कालीन  सेटलमेंट ऑफिसर आरबीएल बँक व तत्कालीन मॅनेजर आरबीएल बँक, शाखा अकलूज या सात जणांनी आपसांत संगनमत करुन 2014-15 साली सुहास बुरगुटे यांच्या नावाने आरबीएल बँकेच्या अकलूज शाखेकडून ठिबक सिंचन संचाचे कर्ज प्रकरण तयार करुन ऐंशी हजार रुपये कर्ज उचलले, व सदर कर्ज प्रकरणात आपण जामिनदार झालेलो नसताना, आपल्या ऐवजी दुसऱ्या व्यक्तिस उभे करुन व सह्या घेऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप करत मिलींद नामदेव काळे यांनी याबाबत वैराग पोलिस ठाणे व पोलिस अधिक्षक सोलापूर ग्रामिण यांच्याकडे लेखी तक्रारी दिल्या. परंतु त्यांनी दखल न घेतल्यामुळे बार्शीतील फौजदारी न्यायालयात खासगी दावा दाखल केला. त्यावर न्यायालयाने गुन्हा दाखल करुन तपास करण्याचे आदेश दिले. त्यानुसार वैराग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)