![]() |
बार्शी विशेष : गल्लीतील तिघाजणांनी मला व माझ्या मुलाला घरात येऊन मारहाण केली आणि लोखंडी रॉडने मारल्यामुळे माझ्या डोळ्याजवळ जखम झाली तसेच पायाची बोटे फ्रॅक्चर झाली अशी फिर्याद सुहास शिवाजी मोरे (वय 53), रा. कसबा पेठ, डमरे गल्ली, बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.
सुहास मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाचे सुमारास माझा मुलगा राज घराबाहेर कट्ट्यावर बसला असताना, त्याला कोणीतरी मोठ्याने शिवीगाळी करत असल्याचा आवाज आल्यामुळे मी घराबाहेर आलो तेव्हा, गल्लीतील प्रदिप भारत गवळी, संतोष बजरंग आगरकर, शुभम विष्णू आगरकर हे तिघेजण माझ्या मुलाला शिवीगाळी करत लाथाबुक्क्याने मारहाण करत असलेले दिसले.
त्यामुळे मुलगा पळत घरात आला, मी पण त्याच्या मागे घरात आलो. त्यावेळी त्या तिघांनी घरात येऊन आम्हाला मारहाण केली. शुभम आगरकर यांनी लोखंडी रॉडने माझ्या तोंडावर मारल्यामुळे माझ्या नाकास व उजव्या डोळ्याजवळ गंभीर स्वरुपाची जखम होऊन नाकातून रक्त येऊ लागले, तसेच माझ्या उजव्या पायावर रॉडने मारल्यामुळे करंगळी व शेजारची बोटे फ्रॅक्चर झाली.
