![]() |
बार्शी विशेष : बार्शी सोलापूर रस्त्यावर लाकूड, पाचोळा पेटवून वाहतूकीस अडथळा केल्याप्रकरणी शहर पोलिसांनी सहा इसमांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ 11 डिसेंबरच्या रात्री बार्शी सोलापूर रोड येथील बारबोले हॉस्पिटल शेजारी रस्त्यावर लाकूड, पाचोळा पेटवून वाहतूकीस अडथळा केल्याबद्दल, शहर पोलिसांनी भारत वसंत कावरे व अन्य पाच अनोळखी इसमांविरोधात भा.दं.वि. १८६० कलम 143, 342, म.पो.अधिनियम 1951 कलम 135, 37(1) व 37(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
