बार्शीतील डमरे गल्लीत झालेल्या मारहाणीबद्दल परस्परविरोधी तक्रारी दाखल

Admin
0

 

Contradictory complaints filed about an assault in Damre Galli in Barshi

Contradictory complaints filed about an assault in Damre Galli in Barshi


बार्शी विशेष : तू इकडे यायचे नाही असे म्हणत गल्लीतील दोघाजणांनी मला शिवीगाळी करत मारहाण केली, त्यामुळे माझ्या दंडास टाके पडले अशी फिर्याद संतोष बजरंग आगरकर (वय 21), रा.  कसबा पेठ, डमरे गल्ली, बार्शी यांनी शहर पोलिसांत दिली आहे.

संतोष आगरकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. 12 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहाचे सुमारास मी काम करुन डमरे गल्लीतील घराकडे आलो व कट्ट्यावर बसलो. त्यावेळी गल्लीतील सुहास मोरे व राज मोरे तेथे आले आणि तू इकडे यायचे नाही असे म्हणून शिवीगाळी करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. त्यामुळे माझ्या डाव्या दंडास मार लागल्याने मी जगदाळे मामा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल झालो. मारहाणीमुळे माझ्या दंडास सहा ते सात टाके पडलेले आहेत.

सदर मारहाणीबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)