कला केंद्रात बैठक पहाताना चौघांनी चाकू कोयत्याने मारहाण केल्याची तक्रार

Admin
0

 

Complaint of being assaulted with a weapon while watching a dance at the kala kendra

Complaint of being assaulted with a weapon while watching a dance at the kala kendra

बार्शी विशेष : बार्शी तालुक्यात जामगांव (आ) शिवारातील एका कला केंद्रात बैठक सुरू असताना चार अनोळखी इसमांनी येऊन चाकू व कोयत्याने मारहाण करुन गंभीर जखमी केले अशी तक्रार विकी सज्जन जाधव (वय ३२) रा. कासेगांव, ता. पंढरपूर यांनी तालुका पोलिसात दिली आहे.

विकी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. १५ डिसेंबर रोजी मी व गावांतील इरफान युन्नुस सय्यद (वय ३१), अल्ताब गुलाब जमादार (वय ३४) व माझा आतेभाऊ प्रविण ईश्वर कांबळे (वय ३४) रा. गोपाळपूर, ता. पंढरपूर असे चौघे मिळून इरफान सय्यद यांच्या कारमधून सायंकाळी सातचे सुमारास कासेगांव येथून येरमाळा येथे देवीच्या दर्शनासाठी निघालो होतो. 

बार्शीमार्गे जाताना जामगांव (आ) शिवारात एक कला केंद्र दिसल्याने रात्री सव्वाअकराचे सुमारास बैठक लाऊन कला केंद्रातील रुममध्ये बसलो. बैठक सुरू असताना रुमच्या दरवाजावर कोणीतरी लाथा मारु लागल्याने रुममध्ये नृत्य करणाऱ्या एका महिलेने दार उघडले. 

तेव्हा बाहेर चार अनोळखी इसम उभे असलेले दिसले. त्यापैकी कानटोपी घातलेल्या एका इसमाने मला शिवीगाळी करुन बाहेर बोलावून, नारळ कापण्याच्या कोयत्याने माझ्या उजव्या कानाखाली मानेवर वार केला. तसेच चौघांनी मिळून आतेभाऊ प्रविण कांबळे यांस कोयता व चाकूने मारहाण करुन गंभीर जखमी केले. आम्हाला मारहाण होत असल्याचे पाहून दोन्ही मित्र घाबरुन बाहेर पळून गेले. आम्ही सगळे घाबरुन गेल्यामुळे पंढरपूर येथे  गेलो व तेथील डॉ. पाटील यांच्या दवाखान्यात प्रथमोपचार घेऊन आज तक्रार देण्यास येथे आलो.

सदर फिर्यादीनुसार बार्शी तालुका पोलिस ठाण्यात चार अनोळखी इसमांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)